Vihann News
728x90 Ad Slot

भारती विद्यापीठ अभिजीत कदम प्रशाला अमरापूर येथे नाविन्यपूर्ण प्रवेशोत्सव

जून १७, २०२५

कडेगांव : आज शैक्षणिक वर्ष २०२६-२६ मधील विद्यार्थ्यांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने करण्यात आले. या शाखेचे प्राचार्य, भाट ए. जे. यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शिवनी फाटा, अमरापूर  येथून ते विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचबरोबर सांप्रदायिक पद्धतीने ज्ञानियाचे द्वारी  माझी पंढरी, तूच माझा विठू तूच माझी रुक्माई या श्लोका मधून अभंगाचे गायन करत अमरापूर येथील ह भ प हरी महाराज अमरापूरकर त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम यांनी संपूर्ण परिसर व वातावरण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये दुमदुमून सोडले. यावेळी  प्रशालेच्या प्रवेशद्वारा जवळ नवीन प्रशिक्षित सर्व विद्यार्थ्यांचे तुळशीचे झाड व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या सभागृहामध्ये नवीन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत पाठ्यपुस्तक वितरण, मोफत शालेयवह्या व स्कूल बॅग देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्री अमोल जाधव सर यांनी केले. यावेळी आपल्या अध्यक्ष पर भाषणामध्ये प्राचार्यांनी भारती विद्यापीठाची ही शाखा एक आदर्श करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिस्त, अभ्यास, परिश्रम करून आपल्या शाळेचे, गावाचे व भारती विद्यापीठाचे नाव जिल्ह्यामध्ये करावे हे थोर साहित्यिक शंकराव खरात यांच्या जीवनपटातील कथेमधून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी पालक त्याचबरोबर शाळा समितीचे उपाध्यक्ष श्री संतोष अंबवडे सर, जुनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख शिकलगार, महाडिक, व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख माने, माध्यमिक विभागाचे पी. एन. चव्हाण तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.