Vihann News

भाळवणी जिल्हा परिषद गटात अमोल शिंदेंची मोठी मोर्चेबांधणी

जानेवारी १४, २०२६

भाळवणी / महादेव धनवडे : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल अनंद शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आरोग्य, शिक्षण, गरजू घटकांसाठी मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या कामांचा जनतेकडून आढावा (रिव्ह्यू) घेण्यात आला असून, या कार्याबाबत नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

“सामाजिक कार्यातून मिळालेला अनुभव, जनतेचा विश्वास आणि विकासाची स्पष्ट भूमिका लक्षात घेता, जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी आहे,” असे अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, युवक व महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“सत्ता नव्हे, सेवा हाच माझा मार्ग”हे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य नसून, आतापर्यंतच्या सामाजिक कार्यातून ते प्रत्यक्षात उतरवले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आदरणीय आ. सुहास भैय्या बाबर आणि आदरणीय अमोलदादा बाबर यांनी संधी दिल्यास, जनतेच्या सहकार्याने आणि विश्वासाच्या बळावर ही पुढील वाटचाल अधिक सक्षम होईल, असा विश्वासही अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.