विटा प्रतिनिधी :
विटा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेतृत्व मा. श्री. अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त ट्री आर्मीच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, खानापूर रोड, विटा येथे भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता ‘एक झाड लावा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. शीतलताई बाबर, विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णाताई पाटील, शिक्षण सभापती डॉ. लिलाताई भिंगारदेवे, नगरसेविका सौ. वनिताताई शितोळे, रसिकाताई सपकाळ, भाग्यश्री तारळकर, दिपाली चोथे, रुपाली पाटील, रणजितदादा पाटील, अमरभैय्या शितोळे, रामचंद्र भिंगारदेवे, श्रीधर जाधव, अनिल कांबळे, रोहन पाटील यांच्यासह ट्री आर्मीचे सदस्य, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शीतलताई बाबर : वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम प्रेरणादायी
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्या डॉ. शीतलताई बाबर म्हणाल्या, “अमोलदादांच्या वाढदिवसानिमित्त ट्री आर्मीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वृक्षारोपणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देण्याबरोबरच समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करण्याची परंपरा निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आज लावलेले प्रत्येक झाड भविष्यात अनेक पिढ्यांना सावली, ऑक्सिजन आणि पर्यावरणाचा समतोल देणार आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही महत्त्वाचे आहे. ट्री आर्मीने केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी. विटा शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. अमोलदादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याला अधिक बळ मिळो, हीच सदिच्छा.”
ट्री आर्मीच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असून, विटा शहराला अधिक हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी आयोजक म्हणून युवानेते रणजितदादा पाटील यांनी केले.

